कालठण नं.१ येथील 'त्या' माशांचे साठे नष्ट करण्याच्या कारवाईस 'राजकारण्याचा वास' कायदा एकच पण न्याय वेगळा वेगळा
इंदापूर (पुणे) : इंदापुर तालुक्यातील मांगूर माश्याच्या पैदाशीचे अनाधिकृत आगर असणा-या कालठण नं.१ येथील 'त्या' माश्यांचे साठे नष्ट करण्याच्या कारवाईस 'राजकारणाचा वास' असल्याचे दिसून येत आहे.कायदा एकच पण न्याय वेगवेगळा असा प्रकार या कारवाईत झाला आहे. ___ मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांची या बाबतची भूमिका संदिग्ध असल्याचे चित्र आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की,कालठण नं.१ मध्ये संदीप अंकुश जाधव, दिलावर यासीन शेख व सलीम बागवान यांची थाई मांगूर माश्यांच्या संगोपनाची तळी आहेत.जाधव यांची पंधरा ते वीस व इतर तळी शेख व बागवान यांच्या संबंधातील आहेत. प्रांताधिकारी, मत्स्यविभागाचे सहाय्यक आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्याकडे मांगूर तळ्यांविषयी तक्रारी झाल्या.मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी या परिसराला भेटी दिल्या. पोलीसांकडे रितसर फिर्याद दिली.गुन्हे नोंद झाले. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरीत लवादाने त्यांचेकडील मुळ अर्ज नं. ३८१ /२०१८ मधील दि. २२ फेब्रुवारी २०१९ रोजीचे आदेश व सहाय्यक आयुक्त मत्सव्यवसाय, पुणे या कार्यालयाच्या दि.६ मे २०१९ रोजीच्या नोटीसीच्या आधारे दि.२७ जुलै २०१९ रोजी तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी जाधव व शेख यांना प्रतिबंधित मांगूर माशांचा अवैधरित्या केलेला साठा नष्ट करावा अशी नोटीस दिली.