मला पोलीस उपनिरीक्षक घडवलं : जीवन डोईफोडे


सुर्डी गाव तस प्रसिद्धी पासून दूर असेलेलंच होतं परंतु गावाने पाणी फाऊंडेशन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक घेऊन गावची ओळखच बदलली, पाणीदार सुर्डी मध्ये पाणीदार अधिकारी ही घडत आहेत.सुर्डी मधील परिस्थितीच भांडवल न करता जीवनाशी संघर्ष करत अधिकारी झालेला जीवन डोईफोडे मनात इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय आपण प्राप्त करू शकतो याची प्रचिती जीवन जालिंदर डोईफोडे या पाणीदार सुर्डी गावातील यवकाने सिद्ध करून दाखवले आहे.अतिशय बिकट परिस्थितीशी सामना करत. आई वडील संसाराचा गाडा हाकत होते. जीवन डोईफोडे यांनी पोलीस उपनिरीक्षक च्या परीक्षेत राज्यात आठवाक्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले होते. घरात अठराविश्व दारिद्रय त्यात शेतीमध्ये पिकत नसे दुष्काळी परिस्थितीने ग्रासलेल्या गावात मोलमजुरी करून आई भिवराबाई पोराला मोठं करायचं सपान बगत होती.जीवनच आयुष्य संघर्षमय होतं.आर्थिक संकटातून हे कुटुंब जात असतांना.दोन दुभत्या गायी घेऊन आई,वडील जीवनाला शिकवत होते याची जाणीव जीवनला पावलो पावली येत होती.आई वडिलांनी ही जीवनच्या शिक्षणास अडथळा येऊ दिला नाही.कारण आपल्या मुलानेही अधिकारी व्हावे अशी आईची प्रबळ इच्छाशक्ती होती.अशातच जीवनही दिवसभर गायी सांभाळत आपले शिक्षण पूर्ण करत होता.आर्ट मधून तो बी.ए. पूर्ण केला.परंतु घरच्या परिस्थितीमुळे तो सुट्टीच्या दिवशी विहरीवर, शेतात कामाला जात असे त्या पैशातून आई वडिलांना मदत होईल व आथिर्क भार कमी होईल.व राहिलेल्या वेळात अभ्यास करत असे जीवनने कोणताही क्लासन लावता चांगल्या गुणांनी नेहमीचं उत्तीर्ण होत असे. एक एक डोंगर सर करत असताना,संकटे साथ सोडत नव्हती अश्यातच एक दिवस वडिलांचं छत्र हरपलं आणि सर्व जबाबदारी आईवरती आली.सर्व आथिर्क कारभार बिगडला जास्तीचं काम करावं लागतं असे.घर चालवण्यासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी आई दसऱ्याच्या शेताला जाऊन पै पै गोळा करत होती आणि आपला विस्कटलेला संसार नीट करू पाहत होती, आईचे कष्ट पाहून जिवनची ही अधिकारी होण्याची इच्छा तीव्र झाली होती,पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, एम.बी.ए.ला नंबर लागला.पुढच्या शिक्षणासाठी सुर्डी सोडून पुणेला जावं लागलं.उच्च पदवीचे शिक्षण घेत असतांना आईचे कष्ट समोर दिसत होते त्यामुळे अधिकारी होण्याचे स्वप्न आणखी बळकट होत असे. शिक्षण घेत असतांना परिस्थितीचं भांडवल कधी केलं नाही जीवनने उच्च पदवी पूर्ण झाल्यावर. एच.डी.एफ.सी.बँकेत नोकरी चालू केली नोकरी करत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. मग बँकेतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचा,शासकीय सेवेत जाण्याचा चंगच बांधला अधिकारी झाल्याशिवाय गावी सुर्डीला जायचं नाही हे ठरवलं होतं.पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालं नाही परंतु चिकाटी सोडली नाही हार मान्य करायची नाही अशी अनेक संकटे आजपर्यंत पचवली आहेत.अधिकारी होऊन आईचे स्वप्न पूर्ण करायचे अशी खूणगाठ मनाशी बांधली होती.अपार कष्ट,मेहनत करत मध्ये तो राज्यसेवा परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आठवा आला आणि शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार झालं.डिसेंबर २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकच खडतर प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण करून आज मितीला मुंबई मध्ये मालाड पोलीस स्टेशनमध्ये आपल्या नव्या कारकिर्दीला सुरवात केली आहे.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image