थाई मांगूर हा मासा हिंसक आहे.इतर माश्यांचे अस्तित्व धोक्यात आणणारा आहे.या व इतर कारणांसाठी भारतात त्याचे संवर्धन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.कश्याचे ही कुजलेले मांस हा या माश्यांचा आहार आहे.त्यामुळे मिळेल त्या प्राण्याचे,कोंबड्यांचे कुजलेले अवशेष यंत्रात किसून त्यांना खाण्यासाठी टाकले जातात. अश्या मांसामुळे माश्यांची ही तळी पराकोटीची दुषित झालेली असतात. उजनी पाणलोट क्षेत्रात नदीपात्राच्या अगदी जवळ ही मत्स्यतळी आहेत.त्यातील दुर्गंधीयुक्त दुषित पाणी कोणत्या ही प्रकारांमुळे नदीपात्रात गेले.तर ते मानवांच्या व जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरु शकते.त्याच बरोबर एक मांगूर मासा जरी नदीपात्रात गेला तरी तो चांगल्या जातीच्या माश्यांच्या विनाशास कारणीभूत ठरु शकतो.
मांगूर मासा
• संपादक:इरफान रहमान शेख