चाकूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान.... August 31, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख चाकूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान.... चाकुर ता.प्र.[अतहर शेख] चाकूर तालुक्यातून गेलेल्या महामार्गावर जागोजागी मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.खड्ड्यामुळे अपघात होऊन निरपराध नागरिकांचा जीव जात आहे. तर कित्येकजण गंभीर जखमी होतात. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजीत करीत आहोत. तालुक्यातील खड्ड्यात अपघात होऊन जखमी झालेल्या नागरिकांना हे रक्त मोफत देण्यात यावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करून आगळावेगळा उपक्रम राबऊन प्रशासनांला जागे करण्याच प्रयत्न होत आहे.नांदेड लातुर हायवेवर खड्डेच खड्डेच झाले आहेत.राष्ट्रीय महामार्गावर रस्ता कमी खडे जास्त झाले आहेत.पावसाळ्यात तर खड्यामध्ये पाणी सांचुन पाणीच पाणी भरुन राहाते. रक्तदान शिबिरामध्ये अजित घंटेवाड,अजय धनेश्वर,विठ्ठल झांबरे,सरस्वती नवरखेले,शिवशंकर निकम,नागनाथ नरवडे,राम कंठे,मनोज शिंदे,शुभम होनराव,महादेव कोरे,सोमनाथ मळभागे,अविनाश झांबरे,सत्यनारायण कोळेकर,गणेश चव्हाण,शिवशंकर केंद्रे,अशुतोष झांबरे,परमेश्वर नवरखेले आदि उपस्थित होते.