बाळभगवन शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण संस्थेकडून भगवान सिंह बयास गुरुजी यांना श्रद्धांजली August 20, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळ व शाहू शिक्षण संस्थेकडून भगवान सिंह बयास गुरुजी यांना श्रद्धांजली ------------------------------- चाकूर ( प्रतिनिधी ) : बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष भगवानसिंह बायस गुरुजी यांचे काल वृद्धापकाळानं निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आज बाळ भगवान शिक्षण संस्थेच्या वतीने येथे शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात सामूहिक श्रद्धांजली चे व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली सभेत शोकभावना व्यक्त करतांना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, आदरणीय भगवानसिंह बयास गुरुजी यांच्या अकाली जाण्याने शिक्षण क्षेत्रातला आधारवड हरपला आहे. शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान तर झाले आहे. परंतु भगवान शिक्षण संस्थेचा एक मार्गदर्शक आम्ही गमावल्याची भावना माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केली. या शोकसभेत अहमदपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी शोकभावना व्यक्त करत माझे गुरु म्हणून भगवानसिंह गुरुजी होते. भगवान सिंह यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कार्य करत होतो. भगवान सिंह गुरुजी यांच्या अचानक जाण्याने आमचं शिक्षण संस्थेचे आणि पर्यायाने मतदार संघाचे मोठे नुकसान झाले आहे व त्यांच्या जाण्यानं जि हानी शिक्षण-क्षेत्राचे नुकसान झाले आहे ती कधीही भरून निघणार नाही. अशा शोकभावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले . या शोकसभा व श्रध्दांजली सभेस बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बळीराम भिंगोले, कोषाध्याक्ष अंकुशराव कानवटे, जि.प. गटनेते मंचकराव पाटील, बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुरजभैय्या पाटील, जि.प. सदस्य माधव जाधव, पर्यवेक्षक दिपक भराटे, प्राचार्य विलास कांबळे,प्रा.भास्करराव माने,माजी मुख्याध्यापक बाबुराव सैदापुरे, शिक्षक प्रतिनिधी पवार एस.डी., प्रशांत पाटील, शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख आदी उपस्थित होते. तसेच यावेळी सामाजिक अंतर ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.