अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेट, लातूर चा काय ?

अँटिजेन टेस्टिंग केंद्रांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिली भेेट, लातूर चा काय ?


 


अँटिजेन टेस्टसाठी मुबलक किट्स उपलब्ध, सरसकट व्यापारी बांधवांनी टेस्ट करून घ्याव्यात - धनंजय मुंडेंचे आवाहन, परळी (दि. १८) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी शहरात व्यापारी वर्गाच्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट केंद्रांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी दररोज ३००० टेस्ट पूर्ण होतील अशी दक्षता घेण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या टेस्टसाठी आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात किट्स उपलब्ध असून सरसकट व्यापाऱ्यांनी या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहन धनंजय मुंडे यांनी व्यापारी बांधवाना केले आहे. यावेळी ना. मुंडे यांच्यासह न. प. चे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदुलाला बियाणी, राजा खान, भाऊड्या कराड, बाळू लड्डा, रवी मुळे, विजय भोयटे, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी, शंकर आडेपवार, अनंत इंगळे, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरमे, डॉ. मोरे, डॉ. चाटे, नायब तहसिलदार रुपनर, चेतन सौंदळे, संग्राम गित्ते, गिरीश भोसले, मोहन साखरे, भागवत गित्ते यांसह परळीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image