*निवृत्तीच्या एक दिवस आधी अधिकार्‍याने काढलेल्या जीआरमुळे कंत्राटदार अडचणीत*

*निवृत्तीच्या एक दिवस आधी अधिकार्‍याने काढलेल्या जीआरमुळे कंत्राटदार अडचणीत* निवृत्तीच्या एक दिवस आधी अधिकार्‍याने काढलेल्या जीआरमुळे कंत्राटदार अडचणीत! सोलापूर : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सर्व पदाधिकारी व संचालक व कंत्राटदारांकडून शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविण्यात आला.‌ सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी. पी. जोशी नामक निवृत सचिव यांनी निवृत्त व्हावयाचे एक दिवस अगोदर मुद्दामहुन शासन निर्णय काढला होता. राज्यातील सर्वच कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांना अडचणीत आणण्यासाठी, कंत्राटदारांवर देशद्रोही खटला दाखल करणे ,काम करताना प्रत्येक गोष्टीत जाणीवपूर्वक अधिकारी वर्ग व कंत्राटदार कायम स्वरुपी भांडण लागावीत व वाद व्हावा अशी अनेक हुकुमशाही व दंडलशाही, जुलमशाही असलेल्या अटी, नियम घालून शासन निर्णय ३० जुलै २०२० रोजी काढला आहे. जेणेकरुन येथुन पुढील काळात पुढे जो सचिव पदाचा अधिभार घेणार आहे. तसेच जे कार्यकारी अभियंता व सर्व अधिकारी यांना राज्याचे विकासाचे कामे न करता कंत्राटदार यांच्यावर फौजदारी खटला, गुन्हा दाखल करणे हेच काम करावे व राज्यातील कंत्राटदार सदर शासन निर्णय रद्दच करावा यासाठी राज्य भर आंदोलन करावे व सगळेजण अशा करोनाच्या बिकट परीस्थितीमध्ये सगळ्यांनी आपापल्याकडे असलेला कामधंदा, व्यवसाय सोडून हेच करावे, राज्यात सगळीकडे अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी तसेच शासन , अधिकारी वर्ग, कंत्राटदार यांच्यामध्ये संभ्रण निमार्ण व्हावा हा कुटील डाव, कारस्थान माजी सचिव यांचा या पाठीमागे होता.


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image