लातूर शहर व जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात यावा आमदार अभिमन्यू पवार यांचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन! August 06, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख लातूर शहर व जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल करण्यात यावा आमदार अभिमन्यू पवार यांचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन! लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी १५ आॅगस्ट पर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मार्च २०२० पासून सतत लाॅकडाऊन असल्याने व्यावसायिक दुकाने व आस्थापनांचे मालक, कर्मचारी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहेत. आरोग्य विभागातर्फे दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करत शहर व जिल्ह्यातील दुकाने, उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूरचे पालकमंत्री मा श्री अमितजी विलासरावजी देशमुख व जिल्हाधिकारी श्री जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे! सा.जनएकता आवाज