*दिव्यांग व्यक्तींना वाटपासाठी आलेल्या कृत्रिम अवयव ठेवलेल्या गोदामाची जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली पाहणी* August 16, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *लातूर*:- जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील 8767 दिव्यांग लोकांना वाटप करण्यासाठी आलेल्या कृत्रिम अवयवांचे वाटप लवकरच करण्यात येणार असून हे साहित्य जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले आहे. *केंद्र सरकारच्या दिव्यांग संवेदना अभियान* अंतर्गत लातूर जिल्ह्यातील 8767 अपंग दिव्यांग लोकांची यादी करण्यात आलेली असून केंद्र सरकार तर्फे दिव्यांग व्यक्ती साठी वेगवेगळे साहित्य हे लातूर जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून अहमदपूर येथील या साहित्याचे गोडाउन मध्ये ठेवलेल्या साहित्याची पाहणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, जिल्हा परिषद सदस्य अशोककाका केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, माजी कृषी सभापती बापूराव राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुमनताई सोनेवाड, जिल्हा परिषद सदस्य मुद्रिकाताई भिकाने , पंचायत समिती सभापती गंगासागर दाभाडे ताई, उपसभापती बालाजी गुट्टे, पं.स समिती सदस्य राम नरोटे, देवकते, गटविकास अधिकारी ढवळशंख आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.