गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर चाकुर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न प्रशासनच्या आदेशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव

गणेशोत्सवमोहरमच्या पार्श्वभूमीवर चाकुर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न ---------------------------------------- प्रशासनच्या आदेशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव ---------------------------------------- सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून त्यामुळे उद्धवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशोत्स्व व मोहरम साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आहवान अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी चाकुर शहरांतील पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीत चाकुर तालुक्यातील व शहर वासीयांना केले. या बाबतीत सवीस्तर माहिती अशी की यावर्षी उद्धवलेले कोरोना परिस्थिती मुळे गणेशाचे आगमन व विसर्जन सध्या पद्धतीने करावे तसेच पोलीस प्रशासनासह नगर पालिकेची रीतसर परवानगी घेणे गणेशाच्या समोरचे सजावटी चे व मंडपाची भमके बाजी नको ती अतीशय साध्या पद्धतीचीे असावी सार्वजनिक गणेश मंडळ करीता चार फुटापर्यत मूर्ती आवश्य घरातील मूर्ती दोन फुटा पेक्षा लहान असावी,शक्यतो पारंपरिक गणेश मूर्ती ऐवजी घरातील मूर्ती धातू संगमकवर मूर्ती चे पूजन करावेत विसर्जनाच्या वेळी गर्दी गर्द करणे टाळावे तसेच या वर्षी सांकृतिक कार्यक्रम ऐ वजी स्वछता आरोग्य कोरोना विषयी जणजागृती करावी जेणे करून कोरोना संसर्गजन्य रोगा पासून संरक्षण होईल शक्य असल्यास रुग्णांचा मनोरंजना साठी कार्यक्रम आयोजित करावे सर्व श्री. गणेशाच्या मूर्ती चे विसर्जन एकत्रित रित्या काढू नये ,मास्क व सेनीटाझंरचा वापर बंधनाकारक आहे अशा प्रकारचे अनेक नियम पाळून गणेश उत्सव साजरा करावे असे करण्याचे आहवन करण्यात आले आहे. या पुढे सर्व सणांचे दिवस येथील सर्व धार्मिक सने हे घरा मध्ये साजरी करून कोरोना संसर्गजन्य आजाराची सावधानता बाळगुंन साजरी करण्याचे अवाहन करण्यात आले. यावेळीं चाकुर पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण,चाकुर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी तोटेवाड,ञ्यंबाक गायकवाड,खंडु दर्शने,निलम घोरपडे, बाळु आरदवाड, उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,सिध्देश्वर पवार,माजी उपसरपंच सय्यद मुर्तुजाअली,व गणेश मंडळाचे पदाधिकारी,मोहरम कमेटी सदस्य ,पोलीस पाटील, समाजातील वरिष्ठ नागरिक सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. चौकट आगामी गणपती उत्सव व मोहरम या संदर्भात चाकुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गणपती मंडळाचे पदाधिकारी व नागरिक यांची अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोना पाश्वभुमिवर मार्गदर्शन केले. सा, जनएकता आवाज न्युज चाकूर तालूका प्रतिनिधी:- अतहर शेख


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image