१२ ऑगस्टला 'वंचित'कडून डफली बजाव आंदोलन

१२ ऑगस्टला 'वंचित'कडून डफली बजाव आंदोलन


 



पुणे:(प्रतिनिधी) दि. ९ - केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्यातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार इ. संघटनांना भेटून या आंदोलनात सामील होण्याची विनंती करावी, असेही आवाहन त्यांनी केलंय. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगावे शिवाय लॉकडाऊनला विरोध का आहे?, हेही समजावून सांगावे असे ही प्रकाश आंबेडकर यांनी शेवटी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.



Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image