जिल्ह्यात रॅपिड अंटीजन टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी पालकमंत्री अमित देशमुख*

*जिल्ह्यात रॅपिड अंटीजन टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी* * *जिल्ह्यात 10 हजार बेडची उपलब्धता प्रशासनाने ठेवावी* *लातूर जिल्ह्यासाठी आणखी एक लाख रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध करून घ्याव्यात* *जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांमधील 80% बेड कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात* लातूर,दि.6(जिमाका):- जिल्ह्यात कोविडच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी एक लाख रॅपिड अंटीजन टेस्ट किट्स उपलब्ध करून घ्याव्यात व लातूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्टिंग कराव्यात अशा सुचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड- 19 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठता डॉ. मोहन डोईबोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यासाठी आतापर्यंत जेवढ्या रॅपिड टेस्ट किट्स आलेले आहेत त्याद्वारे नागरिकांच्या कोविड टेस्टिंग करून घ्याव्यात. तसेच जिल्ह्यासाठी आणखी एक लाख रॅपिड टेस्ट किट्स ची मागणी नोंदवावी व त्या उपलब्ध करून घ्याव्यात. तसेच या किट्सच्या माध्यमातून लातूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी मोठ्या प्रमाणावर करावी, असे त्यांनी सूचित केले. कोविड-19 चा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. व पुढील काळात कोविडची परिस्थिती कशी राहील याबाबत कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात किमान दहा हजार बेड ची उपलब्धता करून ठेवावी व त्यातील 50 टक्के बेड्स या लातूर शहरांमध्ये उपलब्ध असाव्यात या अनुषंगाने प्रयत्न करावेत असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. त्याप्रमाणेच लातूर शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांमध्ये 80% बेडस या कोविड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवाव्यात. जे खासगी रुग्णालय बेड उपलब्ध करून देणार नाहीत त्या रुग्णालयांना आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यात मधील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले. तसेच सर्व शासकीय व खासगी रुग्णालयात मधील बेड ऑक्सिजनेट करून घ्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने कोविड केअर सेंटर मधील व्यक्तींची सिटीस्कॅन व एक्सरे काढून घ्यावा. कारण कोविड टेस्ट करण्यापूर्वी सिटीस्कॅन व एक्स-रे मध्ये अनेक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे केअर सेंटर मधील व्यक्तींचे तपासणी करून त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करावेत व मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर ट्रेसिंग मोहीम राबवावी. तसेच होमकोरंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तीकडून तो घराबाहेर फिरणार नाही हे लेखी स्वरुपात लिहून घ्यावे व त्यानंतर तो घराबाहेर पडल्यास त्यावर कडक कारवाई करावी. कोरोना बाधित रुग्णांस प्रकृती बरी झाल्यावर 10 दिवसानंतर रुग्णालयातून सुट्टीत दिल्यानंतरही आरोग्य यंत्रणेने किमान 7 दिवस त्या रुग्णाची दिवसातून दोन वेळा नियमित वैद्यकीय तपासणी केली पाहिजे, असे निर्देश आयुक्त केंद्रेकर यांनी दिले. लॉकडाऊन चे फायदे हे लॉक डाऊन कालावधीत दिसून येत नाहीत परंतु त्यानंतर या पाच-सहा दिवसात त्याचे परिणाम जाणवतात. प्रशासनाने लाकडाऊन कालावधीत मोठ्या प्रमाणावर कोविड तपासण्या करून घ्याव्यात. Covid-19 चा फैलाव इतरत्र होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश श्री केंद्रेकर यांनी दिले. पुढील काळात कोरोनाची अधिक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी करून ठेवावी. सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील बॅड ऑक्सिजनची उपलब्धता ठेवावी. जी खाजगी रुग्णालये बेड ची उपलब्धता ठेवणार नाहीत त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंध कायदा नुसार कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा पद्धतीने राबविण्यात येत आहेत याची माहिती दिली. तसेच प्रशासनाला पहिल्या टप्प्यात 5 हजार व दुसऱ्या टप्प्यात 25 हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध झालेल्या असून त्यानुसार रॅपिड टेस्टिंग ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती दिली. तसेच पाच खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णावर उपचार सुरू आहेत. या लॉक डाउन कालावधीत जिल्ह्यात व्यापारी, ट्रेडर्स व व्यावसायिकांचे रॅपिड टेस्टिंग सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. *सा.जनएकता आवाज*


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image