बौद्ध, मु्स्लिम तरुणांसाठी महत्त्वाची बातमी; पोलीस भरतीबाबत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

बौद्ध, मु्स्लिम तरुणांसाठी महत्त्वाची बातमी; पोलीस भरतीबाबत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील १४ जिल्ह्यामधून इच्छूक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यामध्येही ती लवकरच सुरु केली जाईल. सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणानंतर सुरु करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात चालू वर्षाखेरपर्यंत साधारण साडेबारा हजार पोलीसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सामान्य ज्ञान आणि शारीरीक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्यास ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज नाष्टा देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्याचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाकरीता प्रत्येक जिल्ह्यास साधारण ५ लाख ६० हजार रुपये खर्च असून यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातून किमान ३० विद्यार्थी आले तरी त्यांचे प्रशिक्षण घेणे संबंधित स्वयंसेवी संस्थेवर बंधनकारक करण्यात आले आहे. असे असले तरीही अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन पोलीस दलात दाखल होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. राज्यात २००९ मध्ये ही योजना सुरु झाली. यातून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक अल्पसंख्याक तरुणांची निवड पोलीस दलात झाली आहे. याशिवाय अनेकांची निवड सीआरपीएफ, एसआरपी, विविध सेना दले, रेल्वे पोलीस, सुरक्षा रक्षक अशा स्वरुपाच्या विविध पदांवर झाली आहे असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image