भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार घरवापसी करणार? नवाब मलिक यांच्या ट्विटने खळबळ August 10, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार घरवापसी करणार? नवाब मलिक यांच्या ट्विटने खळबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र हे वृत्त फेटाळून लावत उलट भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार घरवापसी करण्यास उत्सुक आहेत, अशा प्रकारची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील 12 आमदार भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक असल्याच्या अफवा पसरवत आहेत. आमदार भाजप प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. या उलट निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीकडे परतण्यास उत्सुक आहेत. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, लवकरच हा निर्णय जाहीर केला जाईल, असे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटर हँडल वरून स्पष्ट केले. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.