*आमदार बाबासाहेब पाटील यांनी झरी येथील दिपक पाटील या विद्यार्थ्याला दिला न्याय* August 23, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *आमदार बाबासाहेब पाटील यांनी झरी येथील दिपक पाटील या विद्यार्थ्याला दिला न्याय* चाकुर- झरी येथील दीपक पाटील या विद्यार्थ्यावर महावितरण कंपनीने अन्याय केला होता त्याला जास्त मार्क असून सुद्धा कमी मार्काचे विद्यार्थी घेण्यात आले होते . ही घटना माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे महावितरणच्या मुख्य कार्यालय आहे तेथील अधिकारी इंजुलकर साहेब यांना संपर्क साधून आपण या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर मी हा प्रश्न विधानसभेत उठवीन व त्याच पद्धतीने आमदार बाबासाहेब पाटील हे दृष्टीने कामही करत होते तेव्हा महावितरणच्या प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी दीपक पाटील सह राज्यातील 300 विद्यार्थ्यांच्या न्याय दिला आणि आज ती सर्व विद्यार्थी त्यांना उपकेंद्र सहाय्यक पोस्ट अपेक्षित होती त्या पोस्टवर आज आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मुळे त्याठिकाणी जाऊ शकली आहेत . याबद्दल आज इंद्रायणी या निवासस्थानी एक शिष्टमंडळ माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले..समवेत तुकाराम पाटील,शेषेराव चावरे,बालाजी मेनचक्रे, बबन गव्हाणे, दिलीप पाटील,आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते