लातूरच्या कोरोना वरती मात करण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख व महापौर विक्रांत गोजमगुंडे हे दोघे काय करणार कोरनावर मात करण्यासाठी लातूर शहरात August 09, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख लातूर शहर महानगरपालिकेची महत्वकांक्षी कोरोना तपासणी मोहीम.. १५ तारखेनंतर शहर अनलाॅकडाऊन होईल. वेगवेगळ्या सेवा घेताना, खरेदी करताना नागरिक कोरोना च्या संपर्कात येऊ नयेत म्हणून शहरातील महत्त्वाचे सेवा आस्थापना, दुकाने, विक्री केंद्रे आदी ठिकाणी काम करणाऱ्या सर्वांची १५ आॅगस्ट पूर्वी अॅंन्टीजन किट्स च्या सहाय्याने कोरोना चाचणी करण्याचे एक महत्वकांक्षी अभियान लातूरचे पालकमंत्री मा ना श्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत "शहरातील सर्व हाॅटस्पॉट मधील सर्व नागरिक, शासकीय व खाजगी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी, सर्व आरोग्य सेवक/सेविका,औषध विक्रेते, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, भाजीपाला, फळे व दूध विक्रेते, पेट्रोल पंप व गॅस एजन्सीचे कर्मचारी, बँकांमधील अधिकारी व कर्मचारी, किराणा दुकानदार, पाणी व बर्फ विक्रेते, ऑटोरिक्षा चालक, स्वस्त धान्य दुकानदार, आडत दुकानदार, हमाल व मापाडी, वकील व इतर सर्व व्यापारी" आदींची १५ आॅगस्ट पूर्वी अॅंन्टीजन किट्स च्या सहाय्याने कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या अभियानामुळे कदाचित १५ आॅगस्ट पर्यंत कोरोना बाधितांची संख्या वाढेल पण शहर पूर्ववत होण्यापूर्वी कोरोना झालेल्यांची ओळख पटवून त्यांना आयसोलेट केलं जाऊ शकेल. नागरिकांनी qurantine ची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आम्हाला सर्व लातूरकरांचे सहकार्य हवे आहे.