थकीत पगारासाठी दोन डॉक्टरांमध्ये मारहाण झाली. यात एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरवर दगडाने हल्ला केला आहे. August 19, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *सा,जनएकता आवाज* *लातुरात दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद.* थकीत पगारासाठी दोन डॉक्टरांमध्ये मारहाण झाली. यात एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरवर दगडाने हल्ला केला आहे. लातूर - शहरात डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मध्यंतरी रुग्ण नातेवाईकाकडून मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी डॉक्टरनेच डॉक्टराला दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन डॉक्टरांमध्ये हाणामारी शहरातील बार्शी रोडवर डॉ. रमेश भराटे यांचे गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या रुग्णालयामध्ये लक्ष्मण मोहाळे हा 6 मे रोजी आर. एम.ओ म्हणून रुजू झाला होता. दरम्यान, गायत्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे कोविड सेंटर म्हणून घोषित करण्यात आले होते. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याने महिन्याभरापूर्वी लक्ष्मण मोहाळे यांनी काम सोडले होते. पण 20 दिवसाचा थकीत पगार घेण्यासाठी ते रुग्णालयात आले होते. यावेळी डॉक्टर आणि मोहाळे यांच्यातील भांडण टोकाला गेले आणि यातूनच लक्ष्मण मोहाळे व त्यांच्या मुलाने डॉक्टरांवर दगडाने हल्ला केला. या दोघांनीही रुमालामध्ये दगड गुंडाळून आणले होते. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.