*शिरूर अनंतपाळ तालुक्यात एमआईडीसी उभारनीसाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी...*

अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी...* शिरूर आनंतपाळ तालुक्यात एमआयडीसी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली होती या आधारे उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी: संबंधित विभागांना सर्वे करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर हलकी आणि साकोळ येथील जमिनीची पाहणी औद्योगिक महामंडळाचे मुख्याधिकारी महेश मेघमाळे यांनी केली. शिरूर आनंतपाळ तालुका निर्मिती होऊन वीस वर्षे उलटली पण तालुक्याला अद्यापहि एमआयडीसी झाली नाही.त्यामुळेच तालुक्यात उद्योगधंदे उभारलेले नसल्याने युवकांच्या हाताला काम नाहीत तरुणांना उद्योग धंद्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी परजिल्ह्यात कामाच्या शोधात भटकावे लागत होते आत्तापर्यंत सत्ता असणाऱ्या एकाही राजकीय नेत्यांनी या बाबीकडे लक्ष दिले नसल्याने तरुण वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता दरम्यान राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष तालुक्याचे भूमिपुत्र श्री.सुरज दादा चव्हाण यांनी उद्योग मंत्र्यांकडे या विषयाचा पाठपुरावा केला सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक घेऊन नवीन एमाडिसी साठी तालुक्यातील जागेची पाहणी लवकर करण्याचे निर्देश राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते त्या अनुषंगाने. शुक्रवार दि.4 सप्टेंबर रोजी तालुक्यातील साकोळ व हलकी शिवारामध्ये शासनाच्या वतीने जागेची पाहणी केलीगेली तालुक्याने विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असून यामुळे तालुक्याच्या आशा पल्लवित झाली आहेत. विकासापासून दूर असलेल्या तालुक्याचे विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे तालुक्यातील युवकांना तालुक्यातच रोजगार मिळावा यासाठी तालुक्यामध्ये नवीन एमआयडीसीची उभारण्यासाठी चव्हाण यांनी उद्योग मंत्र्यांकडे मागणी केली होती त्याची दखल घेत उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या सूचने नुसार लातूर-उस्मानाबाद औद्योगिक महामंडळाचे मुख्यअधिकारी महेश कुमार मेघमाळे. एमआयडीसीचे अधिकारी नरवाडे, बालाजी नेलवाड यांनी पाहणी केली असून तालुक्यांमध्ये विनाविलंब कामास सुरुवात झाल्याने तालुका वासीयांतून आनंद व्यक्त केला जात आहे... यावेळी राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष मा.सुरज चव्हाण एमआयडीसी अधिकारी नरवाडे,बालाजी नेलवाड, गणेश राठोड,कल्याण बर्गे,अब्दुल आजीज मुल्ला, नंदकुमार तांबोळकर,युवक तालुकाध्यक्ष राजकुमार बर्गे,कार्याध्यक्ष ओम जगताप, शिवशंकर पाटील, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष बसवेश्वर रेकुळगे व आदी उपस्थित होते....


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image