औसा येथील मिनाज मुख्तार शेख राहणार कालन गल्ली वय 34 वर्ष दोन्ही पायाने अपंग यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्मदहनाचा ची परवानगी मागितली September 25, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख औसा येथील मिनाज मुख्तार शेख राहणार कालन गल्ली वय 34 वर्ष दोन्ही पायाने अपंग यांना प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने त्यांनी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख व लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्मदहनाचा ची परवानगी मागितली लातूर जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन माझे नाव मिनहाज मुख्तार शेख रा. कालन गल्ली औसा वर्ष 34 सर मी दोन्ही पायाने अपंग ( दिव्यांग ) आहे माझ्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व दोन मुले आहेत. व माझे राहते घर 20x15 चे आहे. माझे शिक्षण 12 पर्यन्त झाले आहे तसेच मला कम्प्युटर जॉबवर्क व दुरूस्ती चे संपूर्ण ज्ञान आहे.मी पंचायत संमिती औसा येथे 5 वर्ष संगणक परिचालक महणून काम केले आहे सन 2015 साली कॉंट्रॅक्ट संपल्यामुळे मुळे कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर 2018 मध्ये मला माझ्या मित्रांनी आर्थिक सहकार्य करुण मला 6x4 च पत्र्याचा डब्बा व कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर उपलब्ध करून दिला. पंचायत समिति औसा समोरील गटारीवर स्टॉल लावून मी जॉब वर्क व आपले सरकार सेवा केंद्र चालवून मी माझी माझ्या कुटुंबाची उदरनिर्वाह करत आहे. स्थानिक प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया चालू आहे. मी सन 2011 पासून नगर परिषद औसा व पंचायत समिति औसा, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या कडे शासन निर्णय समान संधि, हक्काचे संरक्षण अधिनियम 1995 अधिनियम क्रमांक 1 कलम 31 नुसार व 25 जुले 2007 शासन निर्णय नुसार नुसार 200 चौ. जागा सवलतीच्या दराने किंवा कब्जेहक्काने देण्यात यावे यासाठी अनेकदा विनंती अर्ज केला आहे परंतु मला कसल्याही प्रकारची दाद मिळाली नाही. जगावर आलेल्या नैसर्गिक आपत्ती (covid-19) लागलेल्या लॉकडाउन मुळे आर्थिक परिस्थिति फार बिकट झाली आहे. मा.पालक मंत्री अमितजी देशमुखसाहेब यांनी केलेल्या विनंती अर्जाला ही दाद मिळाली नाही. मा. जिल्हाधिकारी साहेब मी माझ्या वेदना शब्दात मांडू शकत नाही. तरी मा. जिल्हाधिकारी साहेबांनी माझ्या अर्जाची दाखल घ्यावी अन्यथा मला व्यक्तिक आत्त्महत्या करण्याची परवानगी द्यावी. आपला कृपाभिलाषी मिनहाज मुख्तार शेख दिव्यांग