माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी या योजनेचा अहमदपूर येथे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ., सा, जन एकता आवाज न्यूज चाकुर तालुका प्रतिनिधी अतहर शेख September 15, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी या योजनेचा अहमदपूर येथे पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ., चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार माझी कुटुंब माझी जबाबदारी या जिल्हास्तरीय योजनेचा शुभारंभ आज अहमदपुर येथे पंचायत समिती सभागृहात राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक तथा लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.. जिल्ह्याचे पोलीस उपाधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार तहसीलदार महेश सावंत सह चाकूर-अहमदपूर तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या प्रशासकीय बैठकीत कोरोना परिस्थितीचा दोन्ही तालुक्याचा आढावा पालकमंत्री आमदार देशमुख यांनी घेतला. यामध्ये चाकूर - अहमदपूर तालुक्यात बेड वाढवण्याची निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यात कुठलीही कमतरता पडू न देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकार्यांना दिले. पालकमंत्री नामदार अमित देशमुख यांनी राष्ट्रसंत परम पूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या भक्ती स्थळ या ठिकाणी जाऊन महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून शासनाच्या माध्यमातून बघती भक्ती स्थळाचा परिपूर्ण विकास करण्याचं आश्वासन देण्यात आले, यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बाबासाहेब पाटील व विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते...