राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन.... September 01, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन.... चाकूर प्रतिनिधी: अतहर शेख कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश राज्यातील वीरशैव बांधवांचे श्रद्धास्थान असलेले वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची प्रकृती खालावल्याने नांदेड येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आज मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली आहे वयाच्या 104 वर्षे पूर्ण केलेले राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत प्रतिवर्षी श्रावण महिन्यात त्यांचे तपोअनुष्ठान होत असते या कार्यक्रमासह दरवर्षीच्या गुरुपौर्णिमेला त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक येतात चापोली येथून कपिलधार कडे जाणारी मन्मथ स्वामी पदयात्रा ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे प्रखर राष्ट्रभक्तीचे विचार ते आपल्या प्रवचनातून देत असत मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थ असल्याची बातमी येत होती यावर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन माझी प्रकृती चांगली असल्याचे सांगितले होते त्यानंतर शुक्रवारी सकाळी एक अफवा पसरली कि महाराज आज दुपारी तीन वाजता जिवंत समाधी घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी भक्ति स्थळाकडे गर्दी केली होती त्यानंतर राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सर्व भक्तांना दर्शन दिले आणि स्वतः भक्तांना सांगितले की माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे माझ्यावर विविध डॉक्टरच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत आणि मी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे मी जिवंत समाधी घेणार नसल्याचे घोषित केले होते त्यानंतर महाराज यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आली होती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाराजांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली अहमदपूर येथील मठासाठी उत्तराधिकारी म्हणून राजेश्वर विश्वंभर स्वामी व हाडोळती येथे मठासाठी अभिषेक राजकुमार स्वामी यांच्या नावाची घोषणा त्यांनी यापूर्वी केली आहे.....