मराठा आरक्षणाचा शासनाने त्वरित अध्यादेश काढावा- आमदार बाबासाहेब पाटिल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन! चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 14, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख मराठा आरक्षणाचा शासनाने त्वरित अध्यादेश काढावा- आमदार बाबासाहेब पाटिल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन! चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] मराठा आरक्षणास मिळालेल्या 37 योग्य मार्ग काढून त्वरित अध्यादेश काढावा अशा प्रकारचे मागणी राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात दि-9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा अंतरिम स्थगिती दिली आहे त्या निर्णयाच्या मी सन्मान करतो परंतु गती दिल्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये मेडिकल उच्च शिक्षण व इतर शालेय शिक्षणाकरिता मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश नोकरी भरती संदर्भातील आरक्षण जैसे थे ठेवून सरकारने विशेष वटहुकूम काढून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वरचा अन्याय दूर करावा असे नाही केले तर मराठा समाजातील लाखो विद्यार्थी शिक्षण व नोकरीपासून वंचित राहत. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत त्वरित अध्यादेश काढून यावर्षी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी निवेदनाच्या माध्यमातून आमदार बाबासाहेब पाटील यांनी सरकार दरबारी मांडली आहे....