*आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली चाकूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 22, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली चाकूर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] गेल्या आठवडा भराच्या मोठ्या पावसामुळे चाकूर तालुक्यातील विविध गावातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाळंगी,रामवाडी,जाणवळ,दापक्याळ,नळेगाव या भागाची पाहणी आज आमदार बाबासाहेब पाटील यांनी अधिकार्यां सोबत केली. नुकसान झालेल्या पिकांच्या संदर्भात तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रशासनाला दिले .. यावेळी चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे साहेब,तालुका कृषि अधिकारी पवार साहेब,माजी सभापती पद्माकर पाटील,तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे,अनिलराव वाडकर, ताजोदिन घोरवाडे, हणमंत लवटे,प्रा.यादव कर्डीले,उमेश कर्डीले,सुभाष घोडके,अतुल मुंजाने सह अधिकारी उपस्थित होते.