वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन चालवावी लागत आहेत वाहने.! अपघातात वाढ: लातूर-नांदेड महामार्गावरील चित्र चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 22, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन चालवावी लागत आहेत वाहने.! अपघातात वाढ: लातूर-नांदेड महामार्गावरील चित्र चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] लातूर-नांदेड महामार्गाची खड्डयांमूळे चाळणी झाली असून,वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. या दरम्यान खड्डयांमूळे अपघातात होत असून दोन महिन्यात आठ व्यक्तींना जीव गमवावा लागला, तर 15 जन जखमी झाले आहेत.आणखी किती जणांना जीव गमवावा लागल्यास मग खड्डे बूजविण्याचे काम सूरू होणार आहे, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.. लातूर-नांदेड महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे.त्यामुळे हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या रस्त्याच्या चौपदरी करणाच्या कामाची निवीदा निघाली. काही ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली; परंतु सध्या हे काम बंद आहे या महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून, महामार्गापेक्षा ग्रामीण भागातील रस्ते चांगले आहेत असे म्हणण्याची वेळ वाहण चालकांवर आली आहे.. चाकूर ते लातूर या 40 किलोमिटर अंतरासाठी दिड तासाचा वेळ लागत आहे. खड्डयांमूळे वाहनांच्या देखभाल व दुरूस्तीचा खच॔ तर वाढलाच आहे.यामूळे गरोदर महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे सोबत पाठदूखी व मणक्याचे आजार वाढले आहेत. *रात्रीचा प्रवास करणे आवघड* रात्रीचा प्रवास करणे अवघड झाले असून, पाऊस पडल्यानंतर पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डेही रात्रीरात्रीच्या वेळेस दिसत नाहीत. त्यामुळे रस्ता चौपदरीकरणाचे काम तातडीने सूरू होणे गरजेचे आहे. शहरातील तहसील कार्यालय, बौथी चौक शहरातील मूख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत..