*शहर युवक काँग्रेसच्या वतिने रोजगार दो अभियानाला सुरुवात* *लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने लातूर येथे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात रोजगार दो अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन September 14, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *शहर युवक काँग्रेसच्या वतिने रोजगार दो अभियानाला सुरुवात* *लातूर शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने लातूर येथे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात रोजगार दो अभियानाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरुवात करण्यात आली. एक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा भाजप सरकारने केली होती. प्रत्यक्षात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वर्षाला दोन कोटी पेक्षा जास्त बेरोजगारी निर्मिती होत आहे. नोट बंदी मुळे लाखो युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस च्या वतीने राज्यभर रोजगार दो अभियान राबविण्यात येत आहे तरुणाचा देश असलेल्या भारतात सर्वाधिक तरुण बेरोजगार होत आहेत आणि सरकारकडे त्यांना रोजगार देण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही ही फार दुर्दैवी बाब आहे.भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपला देश अडचणीतून जात आहे. आपल्या देशातील तरुणांच्या हाताला काम नाही. केंद्र सरकारने बेरोजगार तरुण गरीब कुटुंबासाठी NYAY योजना लागू करून पुढील 12 महिन्यासाठी प्रति महिना रोख 6000 रुपये द्यावेत. सदर अभियानची सुरुवात लातूर येथून करण्यात आली या वेळी लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, अजय वाघदरे, बालाजी सोनटक्के, अभिषेक पतंगे,गुरुशांत ढोणे,बालाजी झिपरे,सवई मंदिप, राजू गवळी, गोविंद आलुरे, सुनील वाळे, आबु मनियार, अकबर मांडजे,एम.एच.शेख,विकास कांबळे, शेख खाजा पाशा, दिनेश रायकोडे ,सुमित भडिकर, आदित्य साखरे आदी लातूर शहर युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.* *........... आपल्या लोकप्रिय दैनिका मधून बातमी प्रसिद्धीस देऊन सहकार्य करावे.*