मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरुणांचा चाकूर तहसील समोर आत्महत्येचा प्रयत्न उपचारासाठी हलवले लातुरच्या दवाखान्यात... चाकुर ता.प्र.[अतहर शेख] September 10, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरुणांचा चाकूर तहसील समोर आत्महत्य्येचा प्रयत्न उपचारासाठी हलवले लातुरच्या दवाखान्यात... चाकुर ता.प्र.[अतहर शेख] महाराष्ट्र राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एका उच्च शिक्षित तरूणाने चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी (ता.दहा) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. किशोर कदम असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बोरगाव (ता.चाकूर) येथील किशोर कदम (वय २५) या तरूणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. बुधवारी (ता.९) सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे हताश झालेल्या या तरुणाने तहसील कार्यालयात जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण रद्द झाल्यामुळे माझे जीवन अंधकारमय झाले असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे. हा तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माहिती मिळताच तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी स्वत:च्या शासकीय वाहनातून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी त्या तरूणावर उपचार केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी त्याचा जवाब घेतला व पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहे.