*माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा चाकूर येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 18, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचा चाकूर येथे आमदााार बाबासाहेबा पाटील यांंच्या हस्ते शुभारंभ चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार माफ॔त माझे कुटुंब माझी जबाबदारी हा अभीयान सूरू करण्यात आला आहे प्रत्येकाने आप आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी व कूटूंबाला निरोगीमय बनवावे असा या मागचा उद्देश आहे. आज कोरोणा वाढत असताना आपल्या स्वतःची वैयक्तिक जबाबदारी वाढली आहे आपण सर्वांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पने नुसार आपण स्वतःआपली जबाबदारी व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी असे आव्हान आमदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले. येथील पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या (माझे कुटुंब माझी जबाबदारी) या योजनेचा शुभारंभ आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला संपन्न झाला.. व्यासपीठावर चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे,माजी सभापती तथा नगरसेवक मा.करीम साहेबजी गुळवे,तालुकाध्यक्ष मा.शिवाजीराव काळे,प्रभारी गटविकास अधिकारी एस.बी गोस्वामी,सहाय्यक गटविकास अधिकारी ए.जी गोकनवार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पडगे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, चापोली प्राथमिक वैद्यकीय केंद्राचे अधिकारी डाॅ.धनंजय सावंत,उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,उपसभापती सज्जनकूमार लोणावळे,डॉ.आर.डी टकटावळे सिद्धेश्वर पवार,आबा कवठे, अनिल वाडकर,तुकाराम जाधव,विविध मान्यवर उपस्थित होते... चाकूर तालुक्यातील यावर्षीचा उत्कृष्ट आशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी चाकूर तालुक्यातील पंचायत समितीची विविध प्रशासकीय अधिकारी,चाकूर तालुक्यातील विविध वैद्यकीय अधिकारी तसेच आशा कार्यकर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या....