*मराठा समाजाच्या भावना सरकार पर्यंत पोहोचवणार* सकल मराठा समाजाच्या शिष्ट मंडळाला आमदार बाबासाहेब पाटील यांची ग्वाही! चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 17, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *मराठा समाजाच्या भावना सरकार पर्यंत पोहोचवणार* सकल मराठा समाजाच्या शिष्ट मंडळाला आमदार बाबासाहेब पाटील यांची ग्वाही! चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या कारणांमुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यामुळे मराठा समाजाने आज शिरूर ताजबंद येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवास स्थानी घंटानाद आंदोलन निश्चित केले होते आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहून समाजाच्या भावना कळत आपण स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली होती त्याबरोबर काल मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय व समाजासोबत बैठक घेऊन यासंदर्भात दोन-तीन दिवसात निर्णय घेणार असल्याचेही जाहीर केले आहे. सकल मराठा समाज अहमदपूर चाकूर चे कार्यकर्ते आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी आल्यानंतर सर्व समाज बांधवाचा सन्मान करत त्यांची निवेदने स्वीकारले व या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मराठा समाजाच्या भावना राज्य सरकार आणि केंद्र सरकार पर्यंत पोहोचण्याची लेखी आश्वासन आमदार बाबासाहेब पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले व मी संपूर्णपणे आपल्या समाजात सोबत असल्याची ग्वाही आमदार बाबासाहेब पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिली...