मुस्लिम समाजाला आरक्षण संरक्षण शिक्षणाची गरज - शरद पवार

मुस्लिम समाजाला आरक्षण संरक्षण शिक्षणाची गरजशरद पवार बार्शी - मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. सध्या आरक्षणाचा प्रश्न टोकाला जात असून, वंचित घटकांना शिक्षित करण्यासाठी आरक्षण ही गरज असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. गौडगाव (ता. बार्शी) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आरक्षणाचा प्रश्न टोकाला जात आहे. आरक्षण हे शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक अशा इतर वंचित घटकांना हवे आहे; मग ते कोणत्याही जाती धर्मातील असोत. आरक्षणाचीही मागणी योग्यच आहे. शिक्षणात आरक्षण असणे आवश्‍यक असून शिक्षण घेऊन वंचित घटक मुख्य प्रवाहात येऊ शकतील. शैक्षणिक संस्थांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभारले पाहिजे. काळ बदलत आहे, केवळ शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आले तर कुटुंबाची प्रगती होत नाही. शेतकरी कुटुंबाने शेती, उद्योग, शिक्षण घेऊन नोकरी असे वेगवेगळे स्रोत निर्माण करणे आवश्‍यक आहे. शेतीबरोबर अन्य उत्पन्नाची साधने निर्माण करावीत.''


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image