पोलीस उपनिरीक्षक-राजेश घाडगे यांचा लातूरकरांचा तर्फे अभिनंदन...! September 24, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख पोलीस उपनिरीक्षक-राजेश घाडगे यांचा लातूरकरांचा तर्फे अभिनंदन...! लातुरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान 75 वर्षीय एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला, निमोनिया आणि इतर आजारामूळे या आजीना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, त्या त्यांच्या मुलीकडेच राहत होत्या असं सांगण्यात येत आहे, त्यांना मुलगा नाही..नातेवाईकांनी 20 हजार ऍडव्हान्स रक्कम भरली होती, मात्र हॉस्पिटलचे बिल झाले 48 हजार...एक तर मृत्यूचं दुःख आणि त्यात बिल भरण्याची परिस्थिती नाही...हॉस्पिटल बिल भरल्या शिवाय काही डेथबॉडी ताब्यात देईना... या सगळ्यात नातेवाईक आणि हॉस्पिटल यांच्यात तणाव निर्माण झाला. मग काय ..हॉस्पिटल बाहेर गर्दी झाली, संघटना आली,कार्यकर्ते आले,कॅमेरा आला...आणि पोलीसही पोहचले.. कार्यकर्ते डॉक्टरांना चर्चेसाठी बाहेर या,बाहेर या, अश्या घोषणा देत होते ,मात्र डॉक्टर यायला तयार नव्हते.. अखेर सुट्टीवर असतानाही तिथे पोहचलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर आणि कार्यकर्त्यांशी सवांद सुरू केला, डॉक्टरांचं म्हणणे होते, आम्ही थोडं सहन करतो -तुम्ही थोडं सहन करा, उर्वरित डॉक्टरांची संघटना भरेल...मात्र नातेवाईकांची पैसे भरण्याची परिस्थिती नव्हती...अश्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी पुढाकार घेतला , खिश्यातून दोन हजार रुपये काढत त्यांनी आपण ही मदत बिल भरण्यासाठी नातेवाईकांना देत असल्याचे जमलेल्या लोकांना सांगितले, मग काय पोलिसांच्या या भूमिकेने उपस्थित कार्यकर्तेही पुढे आले,त्यांनीही जमेल तशी मदत द्यायला सुरुवात केली...प्रशांत चव्हाण-2000, संजयकुमार सुरवसे--500, असे करता करता काही रक्कम जमा झाली.. त्यामुळे हॉस्पिटलचे 28 हजार पैकी 18 हजार 500 बिल अदा करता आले, आणखी दहा,अकरा हजार उरले ते भरण्याची हमी डॉक्टरांच्या संघटनेने दिली...त्यानंतर तणाव निवळला, नातेवाईकांना डेथबॉडी ताब्यात देण्यात आली...नातेवाईक , संघटनेचे कार्यकर्ते आणि हॉस्पिटलचे संचालक सगळे समाधानी झाले..पोलिसांची समयसुचकता आणि पुढाकाराने... कितीही तणावाच्या परिस्थितीत कसा मार्ग निघू शकतो, याचंच हे उत्तम उदाहरण..म्हणून लातुरच्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे,पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांचं अभिनंदन, आणि ज्यांनी ज्यांनी या प्रसंगी सढळ हाताने मदत केली त्यांचही कौतुक, रुग्णहक्क संघर्ष समितीचे adv. निलेश करमुडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचही अभिनंदन...त्या आजींना भावपूर्ण श्रद्धांजली..!