मनसेचे अष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन.... चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख]

मनसेचे अष्टामोड येथे रास्ता रोको आंदोलन.... चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] (लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती करा) लातूर नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग लातूर ते अहमदपूर पर्यंत व पुढेसुद्धा अत्यंत खराब होऊन त्यावरती दोन दोन फूट खड्डे पडले आहेत.त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,रोज अपघात होत आहेत,लोकांचे जीव जात आहेत तरीही राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येत नाही याचा निषेध नोंदवत तात्काळ रास्ता दुरुस्ती करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन घेण्यात आले.यामध्ये वाहनांच्या रांगा चार पाच किलोमीटर पर्यंत लागल्या.डॉ भिकाणे यांनी जोपर्यंत महाराष्ट्र प्राधिकरण चे अधिकारी स्वतः उपस्थित राहून लेखी स्वरूपात हामी देऊन लगेच दुरुस्ती चे काम सुरू करत नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका घेतली.आंदोलन कर्त्यांची जनहितार्थ भावना लक्षात घेऊन तहसीलदार डॉ शिवानांद बिडवे यांनी पुढाकार घेऊन त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले व त्यांच्या कडून लेखी घेऊन मनसेने आंदोलन संपवले.यावेळी पोलीस निरीक्षक जयवंत चौहान यांनीं कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत चोख बंदोबस्त ठेवला. चौकट...[तात्काळ दुरुस्ती सुरू होणार..डॉ भिकाणे मुख्य प्राधिकरण अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू होणार व यासाठी दहा कोटीचे टेंडर मंजूर केल्याचे लेखी स्वरूपात पत्र आम्हला दिले आहे.तात्काळ खड्डे भरून त्यावरती पक्के काम दिलेल्या मुदतीत पूर्ण नाही झाले तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही डॉ भिकाणे यांनी दिला.] या आंदोलनाला तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी,कृषितालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, उपाध्यक्ष ज्ञानोबा गुरव, जनार्धन इरलापल्ले,जिल्हाप्रसिद्धिप्रमुख यश भिकाणे,दत्ता सूर्यवंशी,अविनाश झाम्बरे,विठ्ठल पंडगे, तुळशी दास माने,मारुती पाटील आदी उपस्थित होते.


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image