<no title>राज्यातील मृत कोरोना बाधित पत्रकारांना 50 लाख रुपयांची मदत करा* *चाकुर तालुक्यातील पत्रकारांची मागणी* September 18, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *राज्यातील मृत कोरोना बाधित पत्रकारांना 50 लाख रुपयांची मदत करा* *चाकुर तालुक्यातील पत्रकारांची मागणी* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] राज्यात कोरोनाचे संकट अधिक वाढत चाललेले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाचं काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना ही कोरोनाने सोडले नाही.राज्यातील अनेक पत्रकारचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.राज्य सरकारने या सर्व पत्रकारांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर करावी व ती तात्काळ द्यावी व सर्व राज्यातील पत्रकार यांचा आरोग्य विमा उतरवावा अशी मागणी आज चाकूर तालुक्यातील पत्रकार बांधवांनी चाकुर तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर शिवानंद बिडवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.. तसेच चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनाही या निवेदनाची प्रत देऊन आपणही विधिमंडळाच्या माध्यमातून पत्रकार यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा अशी विनंती चाकूर तालुक्याच्या पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आमदार बाबासाहेब पाटील यांना केली. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करत पत्रकार यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.. तहसीलदार शिवानंद बिडवे व आमदार बाबासाहेब पाटील यांना निवेदन देताना चाकुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव तरगुडे, सचिव सतीश गाडेकर, प्रशांत शेटे,जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस संगमेश्वर जनगावे, माधव वाघ,मधुकर कांबळे, अशोक बिराजदार, दयानंद सूर्यवंशी,सदाशिव मोरे, दत्ता मेहकरे, चेतन होळदांडगे, सलीम तांबोळी,राज बेंबडे,ओम प्रकाश हुडगे,समाधान जाधव सह विविध पत्रकार उपस्थित होते...