*आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना विविध प्रश्नासंदर्भात निवेदन* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख September 27, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *आमदार बाबासाहेब पाटील यांनी दिले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना विविध प्रश्नासंदर्भात निवेदन* चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] मराठवाड्यात गेल्या आठवडा भराच्या अति पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज मराठवाड्याच्या दौर्यावर आले असता. आज दुपारी 3 वाजता आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात तसेच अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात निवेदने दिली. यात प्रामुख्याने मतदार संघाचा समावेश पोखरा योजनेत करून मतदार संघाच्या गावातील जनतेला न्याय द्यावा अशी प्रमुख मागणी केली, त्याचबरोबर अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस,सोयाबीन अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या संदर्भात शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्याची विनंती आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना केली. त्याच बरोबर मतदार संघातल्या झालेल्या नुकसानीचा आढावा आमदार बाबासाहेब पाटील यांनी कृषिमंत्र्या समोर सादर केला . यावेळी कृषीमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत या मतदारसंघात झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न या राज्याचा कृषीमंत्री म्हणून मी करणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले......