चाकुर शहरातील व्यापार्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन... -------चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] September 13, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख चाकुर शहरातील व्यापार्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन... ---------------------------------------- चाकूर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख] *चाकुर शहरांमध्ये मुख्य बाजारपेठ असलेल्या वर्धलीच्या ठिकाणी मद्यविक्री दुकानांची परवानगी देऊ नये अशी मागणी चाकुर शहरांतील व्यापारी यांनी केली आहे.कित्येक दिवसांन पासुन चाकुर शहरात मुख्य बाजारपेठ आहे.तालुक्यांचे ठिकाण असल्यामुळे दर शुक्रवारी यांच्या बाजारपेठ मध्ये आठवडी बाजार भरतो.जवळपास 80 गावातील लोक येऊन येथे खरेदी विक्री करतात.अशा आर्थिक कणां असलेल्या बाजारपेठेत मद्य विक्री दुकान झाली तर व्यापारी व छोटे उद्योग करुन आपली जे उपजीविका भागवीतात त्यांच्या वर उपासपारीची वेळ येईल.म्हणून येथे मद्य विक्रीच्या दुकानास परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.* चाकूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका जागेत मद्य विक्रीचे दुकान सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या ठिकाणी हे दुकाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, असा ठरावही नगरपंचायतीने घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. तरीही या ठिकाणी दुकानास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे चाकूर शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेल्या मद्य विक्रीच्या दुकानास परवानगी देऊ नये. अन्यथा बाजारपेठे बंद ठेवण्याचा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आला आहे. ही जागा बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी आहे. या ठिकाणापासून मंदिर, शाळा, मशिद हे जवळ असून चारही बाजूने घरे आहेत. तसेच परिसरात शिकवण्या चालतात. या ठिकाणी दारूचे दुकान सुरु झाल्यास बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना तसेच शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना मोठा त्रास होणार आहे. दारूच्या दुकानामुळे बाजारपेठेत गोंधळ निर्माण होणार असून इतर दुकानांमध्ये ग्राहक येणार नाहीत.यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये मद्य विक्री दुकांनास परवानगी देऊ नये म्हणून नगरपंचायतीकडे निवेदन दिले होते.व्यापारीच्या मागणी नुसार दारु दुकानाला मुख्य बाजारपेठेत परवानगी देऊ नये असा ठरावा नगरपंचायतीने दिला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा विचार न करता परवानगी दिली आहे.दिलेला परवाना तात्काळ रद्द कररावा.जर मद्य विक्रीच्या दुकानांस परवानगी दिली तर शहरातील बाजारपेठ बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदनांवर व्यापारी असोशिएनचे अध्यक्ष तथा न.प.उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,विठ्ठल माकणे,सिध्देश्वर पवार,बालाजी सुर्यवंशी,प्रभाकर करंजकर,शिवाजी सुर्यवंशी,नारायण बेजगमवार,रविंद्र निळकंट,अॕड.संतोष माने,निरंजन रेड्डी,विलास सुर्यवंशी,अशोक शेळके,अर्जुन बेजगमवार,विजय होलदांडगे,रामकिशन बेजगमवार,एकनाथ सोलपुरे,जनार्धन देवकत्ते,बबलु फुलारी,सुरज शेटे,सुहास बेजगमवार,आदिच्या स्वाक्षरी आहेत.