*जुक्टा संघटना चाकूर च्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन* चाकूर ता.प्र.[अतहर शेख September 04, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *जुक्टा संघटना चाकूर च्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदारांना निवेदन* चाकूर ता.प्र.[अतहर शेख ] महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना च्या वतीने आज संपूर्ण राज्यभरात प्रत्येक तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरले होते. उच्च माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत, शासन जाणीवपूर्वक या मागण्याकडे काना डोळा करत आहे. याचाच एक भाग म्हणून जुक्टा संघटना, चाकूरच्या वतीने तहसीलदार चाकूर यांना आज रोजी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात घोषित व अघोषित शाळांना विनाअट अनुदान द्यावे, वाढीव पदांना अनुदान द्यावे, २००५ नंतर लागलेल्या सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यासाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना प्रा.बाळासाहेब बचाटे, प्रा.संतोष हुडगे, प्रा.गजानन पाटील, प्रा.विजयकुमार भालेकर, प्रा. ज्ञानोबा हेमनर, प्रा.शिवकुमार हिंडे , प्रा. राजेश गायकवाड, प्रा.दयानंद झांबरे, प्रा. मंगरुळे आय.जी. हे उपस्थित होते. यावेळी चाकूर तालुक्यातील अनेक प्राध्यापक सहभागी असुन कोविड 19 मुळे ठराविक प्राध्यापकांनी आज हे निवेदन दिले...