*उदगीर शहरात डेंग्यू, चिकन गुनिया चा वाढत प्रभाव व मोकाट डुकरे ,जनावर व कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तेच जनावरे नगरपरिषद मध्ये आणून सोडू महाराष्ट्र जन एकता संघटनेचा इशारा व निवेदना द्वारे मागणी* September 03, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *उदगीर शहरात डेंग्यू, चिकन गुनिया चा वाढत प्रभाव व मोकाट डुकरे ,जनावर व कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तेच जनावरे नगरपरिषद मध्ये आणून सोडू महाराष्ट्र जन एकता संघटनेचा इशारा व निवेदना द्वारे मागणी* *उदगीर*:- उदगीर शहरात कोरोना पाठोपाठ चिकनगुनिया डेंगू या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहे नगरपरिषद ने प्रत्येक वार्डात औषधी धूर फवारणी करावी.आणि उदगीर नगरपरिषद यांना वारंवार या मोकाट जनावरांची कल्पना व तक्रार देऊन सुद्धा त्यांचा बंदोबस होत नाही.उदगीर शहरात कोरोना चा पादुर्भाव वाढलेला असताना त्यात डेंगू चिकनगुनिया यासारखे रोग घाणीमुळे वाढत आहेत शहरातील मोकाट जनावर कुत्रे व डुकरे यांच्या मुळे घाणीच्या सम्राज्य निर्माण झाल्याने डेंगू चिकनगुनिया सारखा रोगांचा प्रसार होत आहे.तसेच मार्केट आणि प्रत्येक वार्डात मोकाट डुकरे व जनावर कुत्र्यामुळे उदगीर शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहरातील या सर्व जनावर याचा बंदोबस लवकरात लवकर करावे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे उदगीर तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,युवा शहराध्यक्ष शेख जोहेब ,शहराध्यक्ष नौमान सय्यद, फिरोज सौदागर, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.