देवणी नगर पंचायत यांच्या अहवाला वरून जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना फी माफीची निर्देश देण्याची मागणी.. September 14, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख देवणी नगर पंचायत यांच्या अहवाला वरून जिल्हा प्रशासनाने घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना फी माफीची निर्देश देण्याची मागणी.. मागील सहा महिन्या पूर्वी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या मागणीमध्ये लातूर मनपा मध्ये घरकुल लाभधारकांची बांधकाम परवाना व इतर शुल्क माफ केल्याचे पुरावे सादर केले असून याच आधारावर देवणी शहरातील लाभधारक बाबत फी इतर शुल्क माफ करण्याची मागणी केली असता . सतत पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अति तात्काळ कारवाई संदर्भात पत्रावर मुख्याधिकारी देवणी यांनी. दिनांक.28/08/2020 च्या दिलेल्या निवारण अहवालात बांधकाम परवाना संदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यास माफी संदर्भात कारवाई करण्यात येईल येईल असे नमूद करून प्रस्तुत मागणीसंदर्भाचा चेंडू जिल्हा प्रशासनाकडे टाकल्यामुळे जिल्हा प्रशासनाने देवणी शहरातील 650 घरकुल लाभधारकांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी अशासकीय सदस्य श्री पांडुरंग रामराव कदम व सहयोगी यांनी जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केली आहे. थोडक्यात असे की. देवणी शहरातील घरकुल लाभधारकांच्या न्याय हक्कासाठी मंजुर प्रत्येकी एका लाभार्थ्यांकडून बांधकाम परवाना व इतर मारकोट फीस च्या नावाखाली वीस ते पंचवीस हजार रुपये नगरपंचायत कडून होणारी आर्थिक लूट थांबवावी. लातूर मनपा मध्ये बांधकाम परवाना व इतर शुल्क माफ केले असून याच आधारावर देवणी शहरातील घरकुल लाभधारकांना लादलेली चौरस फूट साईट प्रमाणे पंधरा ते वीस हजार रुपये होत असलेली बांधकाम परवाना फीस. माफ करावे. बांधकाम नकाशा फीस 1750 रुपये घेतलेले असून याच फिसमध्ये मार्क आउट टाकावे. अतिरिक्त लावलेली मार्क आउट फीस पाच हजार रुपये रद्द करावे. 510 चलन फीस औसा नगरपरिषदेला आदेश दिल्याप्रमाणे देवणी नगरपंचायतीने परत करण्याचे निर्देश द्यावे. लातूर औसा च्या धर्तीवर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिला हप्ता विनाअट खात्यावर जमा करावे. प्रधानमंत्री आवास लाभधारक मंजूर 575 पैकी.184. घरकुल चे काम चालू आहे. उर्वरित.391. लाभधारक मागील दोन वर्षापासून प्रतीक्षेत आहेत. डीपीआर नंबर तीन प्रलंबित यादी प्रसिद्ध करावी असे निवेदनात नमूद करून. देवणी नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभधारकांना शासन नियम लागू होतो लातूर मनपा अंतर्गत घरकुल लाभधारकांना नियम लागू होत नाही. असे भेदभाव करण्याचे संविधानात तरतूद केलेले नाही. तालुकानिहाय स्वतंत्र कायदा अस्तित्वात आलेले नाही. नगर विकास विभाग करिता माननीय अतिरिक्त आयुक्त सतीशजी शिवणे यांच्याकडून लोकशाही चा अवामान करणारे व अर्जदाराची दिशाभूल करणारे पत्र देऊ नये मुख्याधिकारी देवणी यांनी मागील तक्रारअर्जातील सात मुद्द्याची चौकशी न करता एकच मुद्द्याची बांधकाम फी माफी संदर्भात दोन ओळीचे अहवाल वर जिल्हा प्रशासनाने जशाच्या तसे कळवून अर्ज निकाली काढणे ही एक अतिशय गंभीर व लाजिरवाणी बाब असल्याचे असे निवेदनात नमूद करून मागणी अर्जातील चार मुद्दे नुसार पारदर्शक कारवाई करून 650 घरकुल लाभधारकांना वरील मागण्या संदर्भातील फी माफी करण्याचे निर्देश देवणी नगर पंचायत प्रशासनाना द्यावे द्यायचे नसेल तर आर्थिक लूट करण्याकरिता मान्यता द्यावी घरकुल लाभधारकास न्याय मिळवून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी लातूर मा. मुख्यमंत्री .सचिव गृहनिर्माण हौसिंग मंत्रालय. सचिव नगर विकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रती पाठवलेले आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते श्री पांडुरंग रामराव कदम. बहुजन मुक्ती पार्टी देवणी शहर अध्यक्ष अखिल खादर साब सय्यद . यांच्या स्वाक्षर्या आहे त