चाकुर शहरातील मुख्य बाजारपेठ १००% बंद,मद्य विक्रीच्या दुकानांस व्यापाऱ्यांनी केला कडाडुन विरोध September 15, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख चाकुर शहरातील मुख्य बाजारपेठ १००% बंद,मद्य विक्रीच्या दुकानांस व्यापाऱ्यांनी केला कडाडुन विरोध यापेक्षाही उग्र आंदोलनांचा व्यापाऱ्यांचा इशारा चाकुर ता.प्र.[अतहर शेख ] चाकुर शहरांतील मुख्य बाजारपेठेतच होत असलेल्या दारु (मद्य) विक्रीच्या दुकानांस विरोध म्हणून आज मंगळवारी चाकुरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी आसोशियनकडुन कडेकोट बंदचे आहवान करण्यात आले होते.त्याआहवानांस चाकुर शहरांतील व्यारीर्यांनी १००% प्रतिसाद दिला.व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपआपली दुकाने बंद ठेऊन दारु दुकानाला कडाडुन विरोध दर्शविला.चाकुर शहारातील पुर्ण बाजारपेठ दिवसभर बंद होती. नगरपंचायत मिळकत क्रमांक [1393] यादुकांनामध्ये नवीन दारु विक्री व परमिटरुम दुकांनात सुरु होत असुन सदरील दुकान मुख्य बाजारपेठेत आहे.नगरपंचातीचा मोठा आठवडी बाजार यांचा मुख्य बाजारपेठेत भरतो.बाजारांत महिला,वयोवृध्द पुरुष,स्ञी,शेतकरी,शेतमजुर,भाजीपाले विक्रेता,छोटे व्यापारी,हातगाड्यावरील व्यवसायिक मंडळी मोठ्या प्रमाणात येत असतात.या ठिकाणांपासुन जवळच मारोती मंदिर असुन अनेक भक्त मंडळी दिवसभर दर्शनांस येतात.यासर्व दृष्टीने दारु दुकान असुविधा ञासदायक होणारे अनेक समस्यांना तोड घ्यावे लागु शकते. याठिकाणां पासुन जि.प.मुलांची व मुलीची शाळा असुन यांचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.अनेक सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,राजकीय कार्यक्रम व सभेचे मुख्य ठिकाण आहे.जर याठिकाणी दारु विक्री व परमिट रुम दुकान सुरु झाल्यास बाजारपेठेतील व्यापारी,ग्राहक,रहिवाशी, महिला,विद्यार्थी,रुग्ण,वयोवृध,भिविक भक्त मंडळी यांना यादुकानाचा मोठा ञास होणार आहे.यांचा परिणाम म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल नशापान करणारी मंडळी रस्त्यावर असतील.त्यामुळे महिलांना असुरक्षितता होईल.व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दारु दुकानाला मुख्य बाजारपेठेत परवानगी देऊ नये असा ठरावही नगरपंचायतीने दिला असतानाही राज्य उत्पादक शुल्क विभागाने याचा विचार न करता या दारु दुकानाला परवानगी दिली आहे.दिलेला परवाना तात्काळ रद्द करावा. शाळेत जाणाऱ्या मुलांवर वाईट परिणाम होईल.सर्वच चाकुरकर या दारु दुकानांचा विरोध करीत असुन शहरात येणारे दुकान चालु करु नये अशी मागणी केली आहे.आंदोलनांचा दुसरा टप्पा म्हणून आज सर्वच व्यापारी मंडळीने आपले व्यवहार व दुकान बंद ठेवले होते. जर मद्य विक्रीच्या दुकानांस परवानगी दिली तर शहरातील बाजारपेठ बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला. चाकुर शहरांतील व्यापाऱ्यांनी जर हे दारुचे दुकानांस परवानगी दिली तर आम्ही यापेक्षा ही उग्र आंदोलन करु असा इशारा दिला. व्यापारी आसोशियनचे अध्यक्ष,चाकुर न.प.उपध्याक्ष नितीन रेड्डी, बालाजी सुर्यवंशी,प्रभाकर करंजकर,अभिमन्यु धोंडगे, अर्जुन मद्रेवार, चिटबोने अतीष,गोलावार दिलीप,हाळे महादेव,शेटे महादेव,गजानन करेवाड,नारायण बेजगमवार,अजय धनेश्वर,सचिन व्होट्टे,आदीने बंदसाठी पुढाकार घेतला.