सरपंचपद ते भाजपाचा राजीनामा, जाणून घ्या एकनाथ खडसेंचा 40 वर्षाचा खडतर राजकीय प्रवास*

*सरपंचपद ते भाजपाचा राजीनामा, जाणून घ्या एकनाथ खडसेंचा 40 वर्षाचा खडतर राजकीय प्रवास*


 


---------------------------------------- लातूर:- महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपाची साथ सोडून एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी दुपारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे एक वजनदार नेते होते. भाजपाचा राज्यामध्ये विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राज्य सरकारमध्ये मंत्री, विरोधी पक्ष नेतेपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या होत्या. 2014 मध्ये राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच खडसे नाराज होते. मागच्या काही वर्षांपासून ते भाजपाच्या सक्रीय राजकारणातून बाजूला पडले होते. आपल्यावर अन्याय होत असल्याची त्यांची भावना होती. आपली नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोठाडी गावात दोन सप्टेंबर 1952 रोजी एकनाथ खडसे यांचा जन्म झाला. एकनाथ खडसे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीपासून झाली. ग्राम पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर 1987 साली ते कोठाडी गावचे सरपंच झाले. 1989 साली भाजपाच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. 1980 साली भाजपामधून त्यांनी सक्रीय राजकारण सुरु केले. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा जनाधार वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसी नेते म्हणून त्यांनी स्वत:ची प्रतिमा तयार केली. महाराष्ट्रात 1995 साली पहिल्यांदा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आले. युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थ-सिंचन ही खाती संभाळली. नोव्हेंबर 2009 ते ऑक्टोंबर 2014 या काळात ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. प्रभावी वकृत्व आणि मुद्देसूद विषय मांडण्याची कला त्यांच्याकडे आहे. पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी तीन जून 2016 रोजी महसूलमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. खडसेंऐवजी भाजपाने त्यांच्या मुलीला रोहिणी खडसेंना तिकिट दिले. शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव केला. 2019 पर्यंत सलग सहावेळा एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक जिंकली. आज 21 ऑक्टोबर, 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे....


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image