*चाकुर नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणूक* October 22, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चाकुर नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने सार्वत्रिक निवडणूक* चाकुर ता.प्रः-[अतहर शेख] नोव्हेंबर ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणार्या नगरपंचायतीच्या प्रभागरचना,आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.चाकुर नगरपंचायतीची मुदत प्रस्तुत कालावधीत संपत आहे.सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभागरचना,आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पारदर्शक करण्यात येणार आहे,त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रत्येक नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीत्या केल्या आहेत.चाकुर नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई सदरचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी बुधवारी दिले. *प्रभागरचना कार्यक्रम* निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 21 अॉक्टोबर 2020 पर्यंत मुख्याधिकारी प्रारुप प्रभागरचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्याकडे सादर करतील .29 अॉक्टुबरपर्यत या प्रस्तावास मान्यता घेतली जाईल.सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडतीचा दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होईल.नगरपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडत 10 नोव्हेंबर 2020 काढली जाईल.18 नोव्हेंबर रोजी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध होणार आहे. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती व सुचनासाठी 18 ते 26 नोव्हेंबरपर्यत कालावधी असेल.हरकतीवर 4 डिसेंबरपर्यत जिल्हाधिकार्याकडे सुनावनी होईल.हरकती व सुचनांचा अभिप्राय विभागीय आयुक्तांकडे 10 डिसेंबर 2020 पर्यंत पाठविला जाईल.अंतिम प्रभाग रचनेस 17 डिसेंबर 2020 घेतली जाईल.24 डिसेंबरपर्यत प्रभागरचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी या आदेशात म्हटले आहे.