*चाकूर येथे व्ही एस पँथर्स संघटनेच्या च्या वतीने हाथरस घटनेच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली!* October 07, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चाकूर येथे व्ही एस पँथर्स संघटनेच्या च्या वतीने हाथरस घटनेच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली!* उत्तरप्रदेश हाथरस येथील 19 वर्षीय मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील तरुणीवर दिनांक 14 सप्टेंबर रोजी काही गुंड वृत्तीच्या नराधमांनी अमानुष बलात्कार करून तिचे हाडे मोडले जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचे कृत्य केले. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे या कृत्याचा तीव्र निषेध करीत व्ही एस पँथर्स तालुका चाकूर च्या वतीने निदर्शने करण्यात आले तसेच पीडितेने मृत्यू आधी पोलिसांना दिलेल्या जबाणीत सर्व काही कथन केले.मनीषा वाल्मिकी ही फक्त 19 वर्षाची होती ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिच्यावर पाळतीवर असलेल्या या नराधमांनी कायद्याची भिती न बाळगता हे दुष्कृत्य केले आहे यावेळी व्ही एस पँथर चाकूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आणि सादर गुन्हा योग्य त्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपीवर त्वरित कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व्ही एस पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या नेतृत्वाखाली जुने बसस्टँड चाकूर येथे आज दिनांक 7/10/2020 रोजी सकाळी 11 वाजता चाकूर तालुकाध्यक्ष शरद किणीकर यांच्या पुढाकाराने निदर्शने करून सदरील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केले गेले यावेळी व्ही एस पँथर्स संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक महानगरपालिका लातूर मा.सचिनभाऊ मस्के,ग्रुप अध्यक्ष अमोल कांबळे , संपर्क प्रमुख आनंदभाऊ जाधव, मुन्ना कांबळे, चाकूर तालुकाध्यक्ष शरद किणीकर, तालुका सचिव अजय शृंगारे , ग्रुप ता.अध्यक्ष अजय वाघमारे, शहराध्यक्ष विक्रम कांबळे, बंटी भोसले.शकील तांबोळी,इस्माइल पठाण, विष्णू अर्जुने,शदुल शेख , सय्यद महोम्मद, महादेव गायकवाड,अनिल भुरे, सिध्दार्थ किणीकर(वि.आ.जिल्हाध्यक्ष), मिलिंद कांबळे, संगम डोंगरे, शैलेष महालिंगे, गजानन कांबळे, अनुज कांबळे, नितीश माणसे, आकाश तेलंगे, नंदू महालिंगे, किरण तलवारे आदी उपस्थित होते.