महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते मा.श्री. Devendra Fadnavis जी लातूर जिल्हा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांच्या सोबत आशीव, बोरफळ, बुधोडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. October 20, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते मा.श्री. Devendra Fadnavis जी लातूर जिल्हा अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर आले असता, त्यांच्या सोबत आशीव, बोरफळ, बुधोडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडून गेलेला आहे, भरून न निघणारे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने तात्काळ मदत घ्यावी, पंचनामे करण्यात अडकू नये. केंद्र सरकार मदत देणार आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. मात्र राज्य सरकारने आपले कर्तव्य पार पाडावे. असे मा.फडणवीस साहेबांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मा.फडणवीस साहेबांनी आत्मीयतेने दिलासा दिला व त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु असून खचून न जाता धीर धरण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे सदर परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल हा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला आहे... त्याप्रसंगी खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, आ.श्री.संभाजी पाटील निलंगेकर, आ.श्री.अभिमन्यूजी पवार, आ.श्री.राणाजगजितसिंहजी पाटील, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, जि.प.अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, जि.प.उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंखे, माजी आ.श्री.गोविंदजी केंद्रे, मा.आ.श्री.विनायकरावजी पाटील, मा.आ.श्री.बब्रुवानजी खंदाडे, मा.आ.श्री.पाशाजी पटेल, भाजपा प्रदेश सचिव श्री.नागनाथजी निडवदे, जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, मा.खा.श्री.सुनीलजी गायकवाड, मा.आ.श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी श्री.जी. श्रीकांत, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा सौ.रेखाजी हाके, शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ.मीनाजी भोसले, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.