राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणी आक्रोश आंदोलनाला औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन या आंदोलनात सहभागी होते October 12, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणी आक्रोश आंदोलनाला औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन या आंदोलनात सहभागी होते राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. शेजारच्या उमरगा येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलेवर अत्याचार झाला, आठवडा झाला तरी गुन्हेगार अजून मोकाट आहेत. मा. गृहमंत्री महोदयांचा पोलीस प्रशासनावर किंचितही अंकुश उरलेला नाही. विलगीकरण कक्षात सुद्धा अत्याचाराच्या घटना घडल्याचे समोर आल्यानंतर एसओपी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली पण सरकारी पातळीवर काहीच हालचाल झाली नाही. गृहमंत्री स्वतः एका न्यूज चॅनेलची मुस्कटदाबी करण्यात व्यस्त आहेत मग महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहायला वेळ कुठून मिळणार? आक्षेपार्ह टीका केली म्हणून एका मंत्रीमहोदयांच्या बंगल्यावर एकाला मारहाण होते, दुसरे मंत्रीमहोदय मराठा आरक्षण मागायला गेलेल्या तरुणाला स्वतः शिवीगाळ करून धमकी देतात तर मग गुन्हेगारांचे मनोबल वाढणारच. सरकारने आपल्या एकूणच निष्क्रिय कार्यपद्धतीचे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. आज लातूर भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनींनी झोपी गेलेल्या राज्य सरकारला जागी करण्यासाठी केलेल्या आंदोलनला औसा आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट देऊन आंदोलनात सहभागी होते