*चाकूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकारी निवड जाहीर* October 22, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चाकूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नूतन पदाधिकारी निवड जाहीर* चाकूर ता.प्रतिनिधी [अतहर शेख] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक विभागाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तालुक्यातील बनसावरगाव येथील तुकाराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हा सरचिटणीस म्हणून चापोली येथील गणेश स्वामी, घरणी येथील सचिन तोरे, तर शेळगाव येथील गणेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून झरी बु येथील राहुल सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे तर तालुका कार्याध्यक्ष म्हणून हिंपलनेर येथील विवेक शिंदे, तर वडवळ येथील नागेश बेरुळे यांची निवड करण्यात आली आहे, तर चाकूरचे युवक शहराध्यक्ष म्हणून बिलाल पठाण यांची निवड करण्यात आली आहे. ही सर्व निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांनी जाहीर केली आहे... या निवडीबद्दल चाकुर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा चाकूर येथे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी काळे, शहराध्यक्ष गणेश फुलारी, प्रवक्ते मधुकर कांबळे, गणेश शिंदाळकर,समाधान जाधव अंकुश बोंबदरे, अनिल वाडकर सह आदी उपस्थित होते...