*शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यात यावे यासाठी चाकूर येथे आंदोलन* *----------------------------------------* *तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मागणीचे निवेदन स्विकारले* *----------------------------------------* *चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख]*

*शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यात यावे यासाठी चाकूर येथे आंदोलन* *----------------------------------------* *तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मागणीचे निवेदन स्विकारले*


---------* *चाकुर ता.प्रतिनिधी:[अतहर शेख]*


*चाकुर तालुका काँग्रेस कमेटी व चाकुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शाशनांने बहुमतांच्या जोरावर शेतकरी व कामगार यांच्या विरोधात काळे कायदे केले आहेत.ते कायदे रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी चाकुर येथील जुने बसस्थानक येथे धरणे आंदोलन करण्यात आले.सर्व प्रथम राष्ट्रपिता माहात्मा गांधी व लालबहादुर शास्ञी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन धरणे आंदोलनांस सुरुवात करण्यात आली.* *यावेळी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षांचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश येथे पोलीसां कडुन धक्काबुकी करण्यात आली त्या घटनेचा निषेध करण्यात आला.व योगी सरकारचा निषेध करण्यात आला.हाथरस येथील सामुहीक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.* *यावेळी आपले विचार व्यक्त करताना विलासराव पाटील म्हणाले की शेतकरी हा देशाचा मुख्य कणा असुन केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे बनवत आहेत.संविधान संसदीय प्रणाली,संघराज्य व्यवस्था या सर्वांना धाब्यावर बसवुन कोणतीही चर्चा अथवा संवाद न करता मोदी सरकाराने बहुमता जोरावर तीन काळे कायदे मंजूर करुन घेतले आहेत.देशातील शेतकरी,शेतमजुर,आडती,कामगार यांच्या विरोधात हा कायदा आहे.नव्या कायद्यामुळे APMC म्हणजे कृषि उत्पन्न बाजार समिती ही व्यवस्थाच पुर्णपणे नष्ट होणार आहे.शेतमालाला किमान आधारभुत किंमतही मिळणार नाही. जो पर्यंत असे जाचक कायदे रद्द होत नाहीत तो पर्यत आम्ही सरकारांच्या विरोधात आंदोलन करणार असे ते म्हणाले.यावेळी धरणे आंदोलना मध्ये चाकुर तहसिलदार शिवानंद बिडवे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.* *धरणे आंदोलनांचे नेतृत्व विलासराव पाटील यांनी केले.यावेळी रामराव बुदरे,सुरेश मुंडे,लताताई चांदसुरे,अॕन्ड. धनजय कोरे,अर्जुने भुंजग आदिने आपले विचार व्यक्त केले.* *विलासराव पाटील,मेयराजबी लखनगावे,रामराव बुदरे, सौ.लताताई चांदसुरे, प्रा.अ.ना.शिंदे,शिवकुमार चांदसुरे,रामराव पाटील, युसुफभाई शेख,खदीर शेख,साजीद लखनगावे, रियाज पठाण, राजकुमार पाटील,गफुर मासुलदार, सुनिल दांडगे, सुनिल शिंदे,प्रकाश पटणे, आनंद झांबरे,सुधाकर पताळे, गोविंदराव धोत्रे, पुंडलिक पाटील,विजय धनेश्वर, बसवराज ईरवाणे, आदि उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुञ संचलन व आभार सलीमभाई तांबोळी मिडिया प्रमुख कॉग्रेस पार्टी यांनी केले.* *धरणे आंदोलनांस पोलीस निरीक्षक जयंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उ.पो.नि. खंडु दर्शने,उपोनि निलम घोरपडे,पो.हे.कॉ.रामचंद्र गुंडरे,बाळु आरदवाड,तानाजी आरदवाड ,जोशी साहेब यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.*


Popular posts
मुलीच्या प्रेम प्रकरणातून मित्रासोबत भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकुने गळा कापून निर्घृणपणे खून करण्यात आला.
Image
आरएनआई सातारा लिस्ट
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
देवणी नगरपंचायत चा भोंगळ कारभार चौकशी व विविध भ्रष्टाचारासंदर्भात राष्ट्रीय समाज पार्टीचा देवणी नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण.
Image
शरद जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन!
Image