राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर यांच्या कडून परीक्षांच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यपालांना पत्र , वेळीच लक्ष घालण्याची मागणी अन्यथा राज्यभर तसेच राजभवणासमोर धरणे आंदोलन करणार October 19, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर यांच्या कडून परीक्षांच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्यपालांना पत्र , वेळीच लक्ष घालण्याची मागणी अन्यथा राज्यभर तसेच राजभवणासमोर धरणे आंदोलन करणार करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विद्यापीठानुसार परीक्षा पध्दतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे , मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गद्शनाखाली आज लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय राज्यपाल मोहदय यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.सदरील निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.मकरंद सावे व कार्याध्यक्ष श्री.प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी लातूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल विहीरे, जिल्हाध्यक्ष adv आशिष वाघमारे, उपाध्यक्ष स्वप्नील दिक्षीत,गोविंद फड,अभिलाष पाटील, बसवेश्वर रेकुळगे ,ऋत्विक सांगावे ,अनिल राठोड, मोहन राठोड,शेख अफरोज ,कबीर शेख ,राणा चव्हाण,अजय फड,अक्षय सरवदे, मयूर हनवते,कपिल धावड आदी पदाधिकारी उपस्थित होते.