*चाकूर येथे लिंगायत महासंघ म.रा.यांचे तहसिलदारांना निवेदन लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी.!* चाकुर ता.प्र.[अतहर शेख] October 08, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख *चाकूर येथे लिंगायत महासंघ म.रा.यांचे तहसिलदारांना निवेदन लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची केली मागणी.!* चाकुर ता.प्र.[अतहर शेख] सरसकट लिंगायतांना आरक्षण लागु करण्यासाठी शासनाने शुध्दीपञक काढावे अशी मागणी महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना चाकुर तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना लिंगायत महासंघाच्या मार्फत करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील वाणी नावाला लागु असलेले आरक्षण सरसकट लिंगायत,हिंदु लिंगायत,अशी कागदपञावर नोंद असणाऱ्या लिंगायत समाजाला मिळावे. महाराष्ट्रात लिंगायत समाजाला लिंगायत,हिंदू लिंगायत,वीरशैव,वाणी या नावाने बोलले जाते व याच नावाने कागद पञावर जातीचा उल्लेख करण्यात आला असुन महाराष्ट्रात वाणी नावाला ओबीसीचे आरक्षण लागु आहे.वाणी व लिंगायत एकाच जातीची नावे असल्यामुळे वाणी नावाला लागु असलेले आरक्षण सरसकट लिंगायतांना लागु होण्यासाठी शासनाने वाणी,लिंगायत,हिंदू लिंगायत,लिंगडेर,व वीरशैव हे एकाच लिंगायत जातीची वेगळे नावे असुन या वेगळ्या जाती नाहीत.हे धरुन सरसकट लिंगायतांना आरक्षण लागु करण्यासाठी शासनाने शुध्दीपञक काढावे अशी प्रमुख मागणी होती.लिंगायत समाजातील वाणी नावाने नोंद असलेल्या महसुली पुराव्यात वाणी,लिंगायत,वाणी नावाचा उल्लेख असेल तर त्यांना आरक्षण लागु झाले आहे.पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लाखो लोकांकडे असे महसुली पुरावे नाहीत.अनेक तहसिल कार्यालयाकडे सुध्दा अशा महसुली पुराव्याची नोंद नाही.म्हणून मा.मुख्यमंत्री महोदयांना आपल्यामार्फत मागणी करण्यात येते.शब्द खेळ व कागदाचा मेळ हा घोळ न ठेवता नवा जीआर काढुन [आरक्षणांचे शुध्दीपञक काढुण]सरसकट लिंगायत समाजाला आरक्षण लागु करुन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनांवर लिगायत महासंघ चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे,सचिव गजानन पाटील,अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे चाकुर ता.अध्यक्ष विलासराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर,सिनेट सदस्य स्वामी रामानंद तिर्थ विद्यापिठ नांदेड, युवराज पाटील,नगरसेवक शिवप्रसाद शेटे, पञकार विकास स्वामी,धिरज माकणे,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत बिबराळे,संगमेश्वर पटणे, तोंडारे संगमेश्वर,शंकरे शिवाजी,कदम धीरज,गंगापुरे विक्रम,शंकरे मल्लिकर्जुन,चंद्रकांत गोरख,शिवकुमार हंरगुळे आदिच्या स्वाक्षरी आहेत.