महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आपत्तीग्रस्थांनी काळजी करू नये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून दिलासा निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्थ भागाची केली पाहणी • औराद नजीकच्या आंतरराज्य रस्ता दुरूस्ती बाबत प्रस्ताव तयार करावा • मांजरा-तेरणा संगमावरील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नदी व्यवस्थापन समितीने अहवाल सादर करावा

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आपत्तीग्रस्थांनी काळजी करू नये पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून दिलासा निलंगा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्थ भागाची केली पाहणी • औराद नजीकच्या आंतरराज्य रस्ता दुरूस्ती बाबत प्रस्ताव तयार करावा • मांजरा-तेरणा संगमावरील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नदी व्यवस्थापन समितीने अहवाल सादर करावा


 


 


लातूर प्रतिनिधी : १८ ऑक्टोंबर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन, खरीप पिके आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यासंबंधी पंचनामे करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, असे सांगून शासन अपादग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांनी काळजी करू नये, अशा शब्दात राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिलासा दिला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी दुपार नंतर निलंगा तालुक्यातील तगरखेडा तसेच औराद शहाजनी येथे भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी हाताशी आलेली खरीप पिके, काढून ठेवलेले सोयाबीन पीक वाहून गेले, शेतात पाणी साठून इतर पिकांचीही नासाडी झाली, शेती अवजारे वाहून गेली, ऊस पीक भुईसपाट झाले आहे, शेताकडे जाणारे रस्ते वाहून गेले आहेत, यासंबंधीची माहिती पालकमंत्री देशमुख यांना दिली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये शासन त्यांच्यासोबत आहे अशा शब्दात पालकमंत्री देशमुख यांनी त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील तगरखेडा गावातील गोपाळ रघुनाथ थेटे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या ऊस, सोयाबीन पिकांची पाहणी केली. श्री थेटे व जवळपासच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या अडचणी शासनाच्या वतीने तात्काळ सोडवण्यात येतील असे सांगून त्यांना धिर दिला. बिराजदार कुटूंबियाचे सांत्वन अतिवृष्टीच्या पावसात तगरखेडा येथील परमेश्वर नागनाथ बिराजदार यांची सोयाबीनची बनीम वाहून गेल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. बिराजदार कुटुंबाची भेट घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. या कुटूंबास शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मांजरा-तेरणा संगमावरील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी नदी व्यवस्थापन समितीने अहवाल सादर करावा मांजरा व तेरणा नदीचा संगम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतीवृष्टीच्या काळात पूर परिस्थिती निर्माण झाल्या नंतर पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांना मोठया अडचणींना तोंड दयावे लागते. ही बाब तेथील शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली असता. नदी व्यवस्थापन समितीने शेतकरी नागरिकांच्या या अडचणी दूर करण्यासाठी प्रस्ताव व अराखडा सादर करावा असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले आहेत. औराद नजीकच्या आंतरराज्य रस्ता दुरूस्ती बाबत प्रस्ताव तयार करावा औराद शहाजणी नजीकचा महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य रस्ता नादूरूस्त आहे. तो नव्याने विकसीत करून सुस्थितीत करावा अशी विनंती या परिसरातील नागरिकांनी केली तेव्हा यासंबंधी तातडीने प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र आणी कर्नाटक राज्याकडे तो सादर करावा असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, अभय साळुंखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडित धुमाळ, लिंबन महाराज रेशमे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, पृथ्वीराज शिरसाठ, दत्तोपंत सुर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, सचिन दाताळ, श्याम भोसले, प्रा. ओमप्रकाश झुरळे, अनिल संगमे, रमेश वाघो, एम.आर.बिराजदार संबंधित विभागाचे अधिकारी आदीसह शेतकरी बांधव उपस्थित होते. --------------------------------------------------------------


Popular posts
मा.अविनाशदादा रेशमे यांचा सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार. निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद येथे मा.अविनाशदादा रेशमे यांची निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औराद सुवर्णकार संघटना, शिवसेना व युवासेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. औराद जवळील प्रतेक गावात शिवसेना व युवासेना स्थापन करणार व पक्ष संघटन करुन औराद ग्रामपंचायततीवर भगवा झेंडा फडकाऊन सत्ता स्थापन करायची आहे असे मनोगत मा.अविनाशदादा रेशमे यानी व्यक्त केले .यावेळी सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील,शंकर पोतदार,मगेश दावरगावे,सत्यनारायण पोतदार,राजकुमार अंबूलगे, पवन अंबूलगे, शिवसैनिक लखन बोंडगे,रंगराज म्हेत्रे,आकाश अंतरेड्डी ,प्रा आण्णासाहेब मिरगाळे ,प्रशांत वांजरवाडे, रवी नागरसोगे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थीत होते.
*चापोलीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- आमदार बाबासाहेबजी पाटील यांचे प्रतिपादन..!*
Image
आज शेतकरी आंदोलन भारत बंदला पाठिंबा तालुका बामसेफ संघटना व मित्र संघटना यांचा जाहीर पाठिंबा तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन.
Image
*अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी गाढवाला निवेदन प्रतीकाआत्मक ?* लातूर शहरातील व जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासा बद्दल सर्व राजकीय व प्रशासकीय लोक डोळेझाक करतात त्यांच्या डोळे उघडण्यासाठी आज माननीय गाढव साहेब यांना अल्पसंख्याक समाजाचे विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
Image
माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Image