कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड November 10, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख कामगार कल्याण मंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वाटप केले लाभांश परळी (शेख मुजीब) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था औरंगाबादच्या वतीने मराठवाड्यातील १९२ सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे लाभांशाची रक्कम सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. या निर्णयाने मराठवाड्यातील कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. कोवीड संसर्गामुळे लाभांश वाटपास अनेक अडचणी येत होत्या. परंतु शासनाने लाभांश वाटपास नुकतीच परवानगी दिली. ही परवानगी मिळताच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन निंभोरकर व सचिव भगवान जरारे यांनी उत्कृष्ट नियोजन करून ९ नोव्हेंबर २०२० रोजी मराठवाड्यातील १९२ सभासदांना ८.५ टक्के या व्याज दराने १० लाख ६१ हजार ८२९ रुपयांचे लाभांश वाटप केले. विशेष म्हणजे लाभांशाची रक्कम सभासदांच्या वैयक्तिक बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात आली. या निर्णयामुळे सभासदांना दिवाळी सणात मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे पतसंस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.