चाकुर नगरपंचायतीची आरक्षण सोडत... चाकूर ता.प्र.[अतहर शेख] November 11, 2020 • संपादक:इरफान रहमान शेख चाकुर नगरपंचायतीची आरक्षण सोडत... चाकूर ता.प्र.[अतहर शेख] नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागाचे आरक्षण सोडत मंगळवारी (ता.१०) काढण्यात आली या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांची निराशा झाली असून नवीन व्यक्तींना संधी मिळणार आहे. नगरपंचायीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदीवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे यांची उपस्थिती होती. प्रभाग एक व दोन सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग, चार खुला, पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग, सहा अनुसुचित जाती महिला, सात सर्वसाधारण महिला, आठ नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, नऊ सर्वसाधारण महिला, दहा अनुसुचित जाती महिला, ११ व १२ खुला, १३ व १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, १५ अनुसुचित जाती, १६ व १७ खुला प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते....